आमची मिश्टि


Comments

  1. आमची मिश्टि हि एक पर्शियन मांजर आहे.खूप सुंदर व गुणी मांजर आहे.आमच्या घरातील एक सदस्य म्हणूनच आम्ही तिला सांभाळतो.ती माझी सून निलोफरची खूप लाडकी आहे .ती जेव्हा आॕफीसमधून येते तेव्हा नेमकी दाराच्या आत येवून थांबलेली असते तिने दरवाजा उघडला की लगेच म्याऊ करुन तिच्या आगेमागे फिरते. दोन महिन्यापूर्वीची घटना आहे .कच-याचा डबा बाहेर ठेवताना ती दरवाज्याच्या बाहेर गेली व बाहेरच राहिली .दोन तासांनी लक्षात आले मिश्टि घरात नाही.सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.दार उघडत नाही असे वाटल्यावर ती खाली वर करत राहिली त्यातून ती घरचा दरवाजा विसरली.तिच्या डोक्यात घराची गॕलरी फिट बसली होती .त्यामुळे खालच्या मजल्यावरील गॕलरीत उडी मारली अडकून बसली.रात्री सापडली

    ReplyDelete

Post a Comment